मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
*गडचिरोली :-* शहरातील स्थानिक जय छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप यांच्या सौजन्याने दरवर्षी मोठया उत्साहात,धूम धडक्यात ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ साजरा केला जातो.भारताचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती निमित्ताने “शिवजन्मोत्सव सोहळा”नेहरू वार्ड द्वाराका नगरी येथील भव्य पाटांगनात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते.त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
जय भवानी, जय शिवाजी,‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला गेला होता.
‘शिवजन्मोत्सव सोहळा’ या कार्यक्रमा निमित्ताने भगवा रंग फेम सुप्रसिद्ध गायिका शहणाज अख्तर यांच्या आर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यांच्या गीताच्या दमदार सादरीकरणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.त्यामुळे संपूर्ण गडचिरोली नगरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ निमित्ताने भक्तिमय झाली होती.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गडचिरोली विधानसभा आमदार डॉ. मिलिंद नरोटे तर कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ वाघरे आणि प्रमुख पाहूने म्हणून युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम,सागरभाऊ निंबोरकर व अनेक पाहुणे मंडळी आणि हजारोच्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज यांचे भक्तगण उपस्थित होते.!