मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सुरजागड लोह खाण प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण, रस्त्यांची खराब स्थिती, आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे तर्क दिले जात आहेत. आता, प्रकल्पाच्या विस्तराबाबत 28 जानेवारी रोजी जिल्हा मुख्यालयात जन सुनावणी आयोजित केली आहे. प्रकल्पाचा विस्तार होण्याच्या प्रस्तावात शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळविण्याचा आश्वासक दावा केला जात आहे. तथापि, या विस्ताराचा तालुक्याला आणि स्थानिक नागरिकांना प्रत्यक्षात किती फायदा होईल, यावर नागरीक
प्रश्नचिन्ह उपस्थित करित आहेत
सूरजागड प्रकल्पामुळे एटापल्ली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढले आहे. उत्खननामुळे निर्माण होणारी धूळ शेतजमिनींवर बसून पिकांचे नुकसान करते. याशिवाय, रस्त्यांवर प्रचंड वाहतूक असल्याने अपघात वाढले आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास वाढले असून, आरोग्यासाठी कोणतीही ठोस सुविधा उपलब्ध नाही.
प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल, असे आश्वासन दिले गेले होते. परंतु, बहुतेक रोजगार बाहेरून आलेल्या मजुरांना दिले जात असल्याने स्थानिकांना फारसा फायदा झालेला नाही. स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी फक्त निवडणूक काळातल्या घोषणांपुरत्या राहिल्या आहेत, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
१)_”प्रकल्पाचा विस्तार सुरू होईल, पण स्थानिक नागरिकांच्या त्रासाची एक लांब लिस्ट आहे. प्रदूषण, खराब रस्ते, पिकांचे नुकसान, आरोग्याचे संकट… या सर्व गोष्टी गंभीर आहेत. प्रशासनाने किंवा प्रकल्प संचालकांनी स्थानिक लोकांच्या भल्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. सरकारने केवळ महसूल मिळवण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, स्थानिकांच्या जीवनावर देखील विचार केला पाहिजे.”_
*नंदू देवाजी मठामी*
*तालुका महा.ग्रामसभा अधक्ष एटापल्ली*
२)
“प्रकल्पाच्या विस्तारामुळे स्थानिक महिलांना देखील रोजगाराच्या संधी मिळू शकतात. खाण उद्योग आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास, स्थानिक महिलांचे जीवनमान सुधारू शकते. सरकारने यावर ठोस कार्यवाही केली पाहिजे, जेणेकरून महिलांना विविध क्षेत्रांमध्ये संधी मिळू शकतील.”
*अश्विनी गुज्जलवार,महिला*
शिवसेना तालुका संघटिका एटापल्ली
उ. बा. ठा.
३)सुरजगड वाढीव प्रस्ताव नसून विनशाचे प्रस्ताव आहे, 3mtpa मंजुरीने पुढील 50वर्ष रोजगाराची संधी होती, तेच 3वरून 40mtpa म्हणजे 12पटीने दगड जाणार,50वर्ष मिडणारा रोजगार 8-10वर्षातच संपुष्टात येईल, आणि या मुळे वाढणारे वातावरण, पाणी, निसर्गावर भयानक परिणाम होणार?
*महेश पुलुरवार व्यापारी संघटना एटापल्ली अध्यक्ष*