काठीने मारहाण करणा­या आरोपींना एक वर्ष परिविक्षाधिन कालावधी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा श्व् मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्र. 1, चामोर्शी श्री. वाय. जे. वळवी यांचा न्यायनिर्णय

178

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

दि. 24/01/2024

सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 10/07/2020 रोजी अंदाजे सायंकाळी 08:00 वा. चे सुमारास खर्रा खाण्याच्या कारणावरुन नरेश परीमल हलदर, अनपुल परीमल हलदर व अनंत परीमल हलदर हे तिघे घराच्या बाहेर आले व यापैकी नरेश हलदर यानी एक लाकडी काठी घेऊन काठीने फिर्यादी नामे राकेश जदुनाथ अधिकारी यांच्या पायावर, छातीचे उजव्या बाजुस, कमरेच्या उजव्या बाजूस व उजव्या हाताच्या दंडावर मारहाण केली तेव्हा फिर्यादी हे खाली पडले. त्यानंतर अनपुल हलदर व अनंत हलदर या दोघांनी फिर्यादी अधिकारी यांना मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीच्या शरीराला दुखापत झाली. याबाबत फिर्यादी राकेश जदुनाथ अधिकारी यांनी वरीलप्रमाणे फिर्याद दिल्याने पोलीस मदत केंद्र घोट येथे फिर्याद दाखल करण्यात आली होती.
पोलीस मदत केंद्र घोट येथे अप. क्र. 420/2020 कलम 324, 323, सहकलम 34 भा.द.वी अन्वये गुन्हा दाखल करुन तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर सदर गुन्ह्राच्या अनुषंगाने तपासाअंती दोषारोपपत्र न्यायप्रविष्ट करण्यात आले होते. यानंतर सदर आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकरीता सरकारी पक्षातर्फे एकुण 03 साक्षिदार तपासण्यात आले. आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये सदर प्रकरणाबाबत परस्पर आपसी तडजोड करण्यात आली. त्यानंतर सरकारी पक्ष व बचाव पक्षाचा सखोल युक्तिवाद ऐकल्यानंतर, तिन्ही आरोपीतांविरुद्ध दोषसिद्ध करण्याइतपत पुरावा असल्याने मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, चामोर्शी श्री. वाय. जे. वळवी यांनी यापुढे आरोपींच्या वर्तवणुकीमध्ये बदल व्हावा व त्यांनी कुणाशीही पुन्हा भांडण करुन दुखापत करु नये याकरीता तसेच आरोपी व फिर्यादी यांच्यात झालेल्या आपसी तडजोडीमुळे परिविक्षाधीन अधिकारी यांच्या देखरेखीखाली काठीने मारहाण करणा­या आरोपींना एक वर्ष परिविक्षाधिन कालावधी व 03 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच रुपये 3000/- नुकसान भरपाई म्हणून फिर्यादी राकेश जदुनाथ अधिकारी यांना देण्याचे आदेशित केले आहे.

सरकार तर्फे श्री. एस.एम. सलामे सहा. सरकारी अभियोक्ता यांनी युक्तीवाद करुन शासनाची बाजू मांडत कामकाज पाहिले. तसेच गुन्ह्राचा तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा/1981 चंचल सोरते यांनी केला. तसेच संबंधित प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करण्याकरीता करिता पोअं/4494 प्रकाश कडलग पोमकें घोट यांनी कोर्ट पैरवी म्हणून कामकाज पाहिले.