धनगर समाजाला अनुसूचित जमाती मधून  आरक्षण देऊ नका आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे महामहीम राज्यपालांना निवेदन

55

 

 

 

 

 

 

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

धनगर समाजाचा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या वतीने करण्यात आलेला सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सार्वत्रिक करण्याची केली विनंती

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात राज्यपाल महोदय यांना भेटून दिले निवेदन

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गडचिरोली:-ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाच्या वतीने  आदिवासी समाजातून धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी शासनावर दबाव टाकून आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे .  परंतु राज्यातील महायुतीचे सरकार अनुसूचित जमाती  मधून धनगर समाजाला आरक्षण देणार नाही असा आम्हाला विश्वास आहे.  परंतु तरीही यतकदाचित तसा निर्णय झाल्यास आदिवासी समाजाची मोठी नाराजी सहन करावी लागेल

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

. त्यामुळे धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनजी यांची गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन देऊन केली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

धनगर समाजाच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाचा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या माध्यमातून करण्यात आलेला अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशीही विनंती केली. मात्र आदिवासींमधून आरक्षण देण्यासंदर्भातील

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कोणताही निर्णय घेताना आदिवासीं नेतृत्वाला व आमदारांना विश्वासात घ्यावे अशी मागणी करीत कोणत्याही परिस्थितीत धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्यात येऊ नये अशी विनंती या भेटी प्रसंगी आमदार महोदयांनी राज्यपालांना केली.