मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार
गुडूजूर गावात नव्याने शाळा सुरु करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. सध्या गावातील सर्व विद्यार्थी शिक्षणासाठी गट्टा, जांभीया, आणि हेडरी या गावांमध्ये शाळेत जात आहेत. मात्र, गावात शाळा नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते, अशी पालकांची तक्रार आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड सचिन मोत कुरवार यांनी ही मागणी पुढे नेली आहे. त्यांच्या सोबत सुरजागड इलाक्याचे प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सैनुजी गोटा, माजी पंचायत समिती सदस्या शिलाताई गोटा, कॉ शरीफ शेख तालुका सहसचिव, कॉ तेजस गुज्जलवार शहर सचिव, कॉ निर्मला गोटा, कॉ रमेश कवडो किसान सभा प्रमुख, गुडूजूर गाव पाटील दलसू पुंगाटी, शंकर आत्राम, पांडू मटामी, नरेश पुंगाटी, चेतन पुंगाटी व इतर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गुडूजूर गावातील पालकांनी स्पष्ट केले आहे की, जर गावात शाळा सुरु झाली, तर ते आपल्या मुलांना गट्टा, जांभीया, हेडरी या गावांमध्ये न पाठवता गुडूजूरच्या शाळेतच दाखल करतील. पालकांनी सांगितले की, दूरच्या शाळांमध्ये मुलांना पाठवणे आर्थिकदृष्ट्या कठीण असून, मुलांच्या शिक्षणावरही त्याचा प्रतिकूल परिणाम होतो.
या वेळी कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की, “गुडूजूर गावात शाळा सुरु होणे अत्यावश्यक आहे. शिक्षणाच्या अभावामुळे अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे, जे अन्यायकारक आहे. शासनाने तातडीने या मागणीची दखल घ्यावी आणि गावात शाळा सुरु करावी.”
गावकऱ्यांनी शाळा सुरु करण्याच्या मागणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. शिक्षण अधिकार्यांनीही यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे या सर्व शिक्षणाविषय समस्या बाबत अहेरी विधानसभा क्षेत्रात भारतीय कम्युनिष्ठ पार्टीची चर्चा जोरात सुरु आहे….







