प्रतिनिधी//
पुणे येथे काल भाजपा प्रदेश कार्यकारणीची १ दिवसीय बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली, ह्यावेळी महाराष्ट्र राज्यातील भाजपाचा सर्व जेष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.
ह्या बैठकीला भाजपा प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची पूर्णवेळ उपस्थिती होती ह्यावेळी राजेंनी अनेक जेष्ठ भाजपा नेत्यांशी संवाद साधला, राजे सोबत भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अशोकजी उईके, गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी तथा आमदार डॉ. रामदासजी आंबटकर सह अनेक भाजपा नेत्यांची उपस्थिती होती.