येर्रागड्डा येथील मृतक बालकांचा परिवारास माजी जिप अध्यक्ष कंकडालवार व मडावी कडून आर्थिक मदत व सांत्वन.

158

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी – तालुक्यातील येर्रागड्डा येथील दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.अहेरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा अंतर्गत येर्रागड्डा येथील बाजीराव रमेश वेलादी वय (6) वर्ष व दिनेश रमेश वेलादी वय (3) वर्ष या दोन भावंडाचा 4 सप्टेंबर ला दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती.काँग्रेसनेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी येर्रागड्डा गावात जाऊन मृत्यूकांच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांना आर्थिक मदत करून कुटुंबाची सांत्वन करून मी तुमच्या सोबत असल्याची जाणीव करत कुटुंबाची मोठ्या आधाराने विचारपूस केले आहे.

यावेळी उपस्थित माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेखा आलम,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,ग्रामपंचायत सदस्य वनिता वेलदी,रामबाई रमेश वेलादी,रमेश चिन्ना वेलादी,मलेश रामदास गावडे, परदेशी भान्ना आलाम, पेंठा मासा वेलादी, कापा सडमा मडावी, सुरेश रामदास गावडे,संतोष आलम,राकेश आलम,राजेश तुंगावार,पूनम निट्टूरी,शांताबाई आलम,नरेंद्र आलम,लिंगा आलम,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.