श्री गुरूदेव जंकास संस्थेने दिला सर्वात जास्त सभासदांना रोजगार #jantechaawaaz#news#portal#

66
प्रतिनिधी//

श्री गुरुदेव जकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची विविध कुप कामाना भेट देऊन कामगारांच्या जाणल्या अडीअडचणी











आरमोरी – तालुक्यातील श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखरा ने आपल्या सभासदांना जंगल कुप कामांच्या माध्यमातून सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून दिला आहे.व वारंवार सभासदांच्या हितासाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबऊन सभासदांच्या कल्याणासाठी संस्था अहोरात्र कार्य करीत असल्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.

जंगल कामगार सहकारी संस्थाना दरवर्षी वनविभागाच्या वतीने जंगल कुप कटाई कामे मिळत असतात. परंतु पाहीजे त्या प्रमाणात रोजगार मिळत नसल्यामुळे सभासदांना दुसरा रोजगार शोधण्याची किंवा परजिल्ह्यात रोजगारासाठी धाव घ्यावी लागत असे त्यामुळे श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांनी अधिक प्रयत्न करुन वनविभागाच्या वतीने आपल्या सभासदांना जास्तीत जास्त  कसा रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करून सभासदांना मोठ्या प्रमाणात रोजगार श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम,

 उपाध्यक्षशेषराव कुमरे यासह पदाधिकाऱ्यांनी सभासद व संस्थेचे हित जोपासुन आरमोरी तालुक्यातील वनपरिक्षेत्रात  देलनवाडी वनपरीक्षेत्रातील कुलकुली यासह गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात कम कामे उपलब्ध करून देऊन  प्रत्येक्ष जंगलातील विविध कुप कटाईच्या कामांना भेट देऊन पाहणी केली व कामगार सभासदांच्या  अडीअडचणी यात पिण्याचे पाणी औषध उपचार राहण्याची व्यवस्था जाणुन जागेवरच समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले.

तसेच संस्थेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यासाठी सचिव गिरीधर नेवारे सदस्य यादोराव कहालकर, सुरेश मेश्राम, दामोदर मानकर, धर्मा दिघोरे धर्मराज मरापा, गोपाल खरकाटे, शेषराव काटेंगे, उज्ज्वला मडावी, गोपिकाबाई कोल्हे गुणवंत जाभुळे दिवाकर राऊत शरद मडावी सुमित बावणे  यांचेही सहकार्य लाभले.