पेट्रोल पंपवरील असुविधा व नफा रक्कमेच्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी, #jantechaawaaz#news#portal#

41

प्रतिनिधी//
एटापल्ली;
              येथील पंचायत समिती मार्फत सुरू असलेल्या पेट्रोल पंपवरील असुविधा व नफा रक्कमेच्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाही करण्याची मागणी  तहसीलदार पी व्ही चौधरी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी संजय मीना यांना नागरिकांनी पाठविलेल्या निवेदनातून केली आहे,
             वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाच्या धोरणावरून मागास, अतिदुर्गम, आदिवासी बहुल व नक्षल प्रभावी एटापल्ली तालुक्याच्या नागरिकांच्या सोयीसाठी भारत पेट्रोलियम या कंपनीचे “विकास सर्व्हिस सेंटर” नामक पेट्रोल पंप सुरू करण्यात आले आहे, सदर पेट्रोल पंपच्या माध्येमातून पंचायत समितीला मासिक लाखो रुपये नफ्याची कमाई मिळत असतांना पेट्रोल व डिजल भरण्यास येणाऱ्या ग्राहकांसाठी पेट्रोल, डिजल भरतांना रांगेत उभे राहण्यासाठी शेड छावणी, शुद्ध पिण्याचे पाणी, महिला, पुरुष व दिव्यांग नागरिकांना स्वतंत्र शौचालय, मुतारी, वाहनातील हवेचे दाब तपासणी यंत्र, इत्यादी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्द नाहीत,
 त्यामुळे ग्राहकांना उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हात तसेच पावसाळ्याच्या भर पावसात तासंतास रांगेत उभे राहून आपल्या वाहनात पेट्रोल, डिजल भरून घेतांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
              सदर पेट्रोलपंपच्या आर्थिक व्यवहार व व्यवस्थापन सांभाळण्याची जबाबदारी एक लाख रुपये पेक्षा जास्त मासिक पगार असलेल्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याकडे असून संबंधित प्रशासकीय अधिकारी हे मूळ आस्थापणाच्या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून त्यांचा संपूर्ण कार्यालयीन वेळे पेट्रोलपंप व्यवस्थापन
 सांभाळण्यात जात आहे. त्यामुळे पंचायत समिती मार्फत शासनाकडून नागरिकांना मिळणाऱ्या विविध लाभाच्या योजनांपासून लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे, सदरचे प्रशासकीय अधिकारी हे पेट्रोल, डीजल विक्रीतून मिळणारी लाखो रूपये नफा रक्कमेची मलई हडप करण्याच्या हेतूनेच मूळ आस्थापणेची कामे सोडून दिवसभर पेट्रोलपंप चालकाचे कामे करत असावे असा संशय घेण्यात आला आहे, पंचायत समिती प्रशासनाच्या
 संगनमताने पेट्रोल, डिजल विक्रीतून प्राप्त होणारी नफा रक्कम केवळ कागदावर विकास कामे दर्शवून पंचायत समिती प्रशासनाने रक्कमेत घोळ केल्याचा आरोपही निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे, त्यामुळे पंचायत समिती एटापल्ली द्वारा संचालित विकास सर्व्हिस सेंटर नामक पेट्रोलपंपच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही करण्याची मागणी
 नगरसेवक मनोहर बोरकर, रवींद्र रामगुंडेवार, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, व्यंकटेश कंदीवार, प्रा विनोद पत्तीवार, तुलसीदास गुडमेलवार, नरोत्तम अधिकारी, अशोक उल्लीवार, रतीप शेख, निलेश गंपावार, लक्ष्मण नरोटे, श्रीनिवास कंबोगोणीवार, विशाल बाला, शिवचरण टोप्पो, उपेश सुरजगडे, रमेश ओडपल्लीवार, सूरज मंडल, गुरुदास बारसागडे, विश्वनाथ जांभुळकर व नागरिकांना जिल्हाधिकारी मीना यांना
 पाठविलेल्या निवेदनातून केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे,