७ जुलैला भारतीय बेरोजगार विद्यार्थी मोर्चाचे प्रशिक्षण

199

प्रतिनिधी//

मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार

#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime

गडचिरोली:-भारतीय विद्यार्थी मोर्चा व भारतीय बेरोजगार मोर्चा च्या वतीने जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर ७ जुलै रविवारला सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे . हे प्रशिक्षण शिबिर इंजिनिअर सुनील दुर्गे यांचे घरी सृष्टी सिलेब्रेशन सभागृह जवळ नवेगाव कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे. भारतात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे . त्यांच्या समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत . त्यावर योग्य उपाय प्राध्यापक स्वप्निल धुर्के हे आपल्या मार्गदर्शनातुन करणार आहेत . याचा लाभ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण पिढीने घ्यावे असे भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने कळविण्यात येत आहे.