मणिपूर येथील महिलांवरील होणाऱ्या घटनेचा निषेध #jantechaawaaz#news#portal#

56
गडचिरोली जिल्ह्यात सैनिक समाज पार्टी देणार प्रशिक्षण. 
गडचिरोली / प्रतिनिधी दि. 27/7/2023:- 
मणिपूर राज्यात घडवून आणलेल्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण भारतात पोहचले तरीही शासन  या प्रकरणी गंभीर नाही. मणिपूर राज्यातील घटना मानवतेला कलंक  असलेली दुख:द घटना आहे. विविध समाज माध्यमातून या अत्याचाराच्या विरोधात हस्तक्षेप करूनही केंद्र शासन गंभीर नाही. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल बलबीर सिंह परमार यांच्या मार्गदर्शनाखाली तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विधितज्ञ ऍड. शिवाजी डमाळे यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथील इंदिरा गांधीं चौकातील विश्राम गृह परिसरात घटनेचा जाहीर  निषेध करण्यात आला.  
  याप्रसंगी महिलांच्या सुरक्षिततेसाठी, आणि देशाच्या विविध भागात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात  सैनिक समाज पार्टीचे वतीने शासनाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे मत  अॅड. डमाळे यांनी व्यक्त केले. महिलांनी सैनिक समाज पार्टीचे वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या  स्वयंसिद्धा प्रशिक्षणात सहभागी होऊन आत्मनिर्भर बनावे. अशी माहिती महासचिव प्रकाशसिंग बंडवाल यांनी दिली.   स्वयंसिद्धा प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवतींना जुडो – कराटे  , लाठी – काठी , कुस्ती यासारख्या प्रशिक्षणा बरोबरच   रोजगाराच्या संधी मिळतील असे व्यवसायभिमुख  कौशल्य विकास प्रशिक्षण  अनुभवी प्रशिक्षकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. असे मत जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सैनिक समाज पार्टीचे विधानसभा प्रमुख हंसराज उराडे, गडचिरोली तालुका नियोजन समिती 
अध्यक्ष निलकंठ सिडाम  , आरोग्य सेलचे प्रमुख प्रमोद सोमनकर, युवा नेते प्रभाकर  कुळमेथे,  आरमोरी तालुका अध्यक्ष  संबाशिव मेश्राम  , विकेश कोहळे, राजू कोंडाकुरला, राजाबापु  बारसागडे, शरदचंद्र जनबंधु, सुबोध म्हशाखेत्री,  निशांत भसारकर, समाजसेवक  वसंत कुलसंगे, देविदास बोरकर  , गुरुदेव भोपये  आदिसहीत बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.