पोलीस मदत केंद्र बोलेपल्ली येथे भव्य महीला मेळाव्याचे आयोजन

97

एटापल्ली: दि.13/03/2024 रोजी पोलीस मदत केंद्र बोलेपल्ली येथे मा.पोलीस अधीक्षक श्री.निलोत्पल सा, मा.अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) श्री चिंता सा., मा. अप्पर पोलीस अधीक्षक(अभियान) श्री. देशमुख सा., मा. अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम रमेश सा. यांचे संकल्पनेतून व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चैतन्य कदम सा. यांचे मार्गदर्शनाखाली *पोलीस दादालोरा खिडकीचे* माध्यमातून *महिलांच्या* सर्वांगिण विकासासाठी, त्यांचे कलागुणांना वाव मिळण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून **पोलीस मदत केंद्र बोलेपल्ली व एस आर. पी. एफ. ** यांच्या संयुक्त विद्यमानाने * *भव्य महीला मेळाव्याचे ** आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती बेबीबाई सोनटक्के महिला ग्राम संघ अध्यक्ष बोलेपल्ली तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वनिता तिम्मा मा.पंचायत समिती सभापती मूलचेरा,वैशाली दुर्गे उपसरपंच बोलेपल्ली, पोमके हद्दीतील महिला व पोमके बोलेपल्ली येथील महीला अंमलदार, एस. आर. पी. एफ. चे पोनि मा. संतोष चौधरी सा., प्रभारी अधिकारी पोउपनि खंडू दर्शने असे सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित होते.
*महिला मेळाव्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले* यांचे प्रतिमेचे पूजन करुन सुरुवात करण्यात आली. मपोशि सुलभा धानोरकर यांनी प्रास्ताविक सादर केले. प्रभारी अधिकारी खंडू दर्शने यांनी पोलीस दादालोरा खिडकीचे माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती दिली.महिला सक्षमीकरण करण्यासाठी पोलीस दलामार्फत महिलांकरिता राबविण्यात येणारे विविध प्रशिक्षण व उपक्रम याबद्दलची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी महिला मेळाव्याला मार्गदर्शन केले.
*सदर मेळाव्याला 200 ते 250 महिला उपस्थित होत्या*
मेळाव्यातील उपस्थित महिलांना साडी ब्लाउज, प्लास्टिक टोपलीचे वाटप व पुरुषांना गमजा वाटप करण्यात आले.
उपस्थित सर्व नागरिकांना उत्तम व रुचकर जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. मेळावा शांततेत पार पडण्याकरिता ज़िल्हा पोलीस अंमलदार, SRPF अधिकारी व अंमलदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.