#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
प्रतिनिधी//
एटापल्ली:जय गोंड गोवारी जय जोहार क्रीडा मंडळ मंगुठा तर्फे आयोजित भव्य व्हॅलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी सहउदघाटक म्हणून सरपंच ललिता मडावी,माजी जि प सदस्य संजय चरडुके,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जि प सदस्य रामजी कत्तीवार, प्रमुख पाहुणे म्हणून माजी प स सभापती बेबीताई नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या एटापल्ली शहराध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार,पोलीस पाटील लखुजी गावडे,बुर्गीचे सरपंच विलास गावडे,माजी जि प सदस्य ज्ञानकुमारी कौशी,तसेच परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व व्हॅलीबॉलप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना हार अर्पण करून ध्वजारोहण करत भव्य व्हॅलीबॉल स्पर्धेचे फित कापण्यात आले. उदघाटनिय सामन्यात भाग्यश्री ताई आणि प्रमुख पाहुण्यांनी व्हॅलीबॉल हातात घेत मैदान गाजविले.मंगुठा सारख्या दुर्गम भागात पहिल्यांदाच भाग्यश्री ताई आत्राम यांच्या पुढाकारातून व्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने या परिसरातील जास्तीत जास्त संघांनी सहभाग घेतला.
दरम्यान व्हॅलीबॉल स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी गावात आगमन होताच मंडळातर्फे ताईंचे व प्रमुख पाहुण्यांचे ढोल ताश्यांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी मंडळाचे पदाधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






