*◆अहेरी◆* : *तालुक्यातील नवेगाव येथील नितेश बाबुराव शेंडे हा युवक गंभीर आजाराने त्रस्त असून तो त्यांचा घरी कमावता एकुलता एक असल्याने घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे, उपचार घेण्यास अडचण होत आहे.ही बाब नवेगाव येथील पदाधिकाऱ्यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या लक्षात आणून दिले.माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना कळताच लगेच नितेश शेंडे यांच्या आईला घरी बोलावून तब्बेतीची विचारपूस करून पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केले.*
*या वेळी श्रीमती वंदना बाबुराव शेंडे,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,प्रवीण रेषे,विनोद कावेरी,सुधाकर कोरेत,तुकडोजी शेंडे उपस्थित होते.*






