एटापल्ली :परिसरातील सी.आर.पी.एफ १९१ वहिनी केरिपू बटालियन तर्फे सिव्हिल ॲक्शन प्रोग्राम-२०२४ अंतर्गत २० महिलांना सिलाई मशीन वाटप करण्यात आले.
दि.९ जानेवारी रोजी सी.आर.पी.एफ कॅम्प एटापल्ली येथे सत्यप्रकाश कमाणडेंट १९१ केरिपु बल यांच्या मार्गद्शनाखाली जीवराज सिंह शेखावत द्वितिया कमान अधिकारी यांच्या प्रमुख उस्थितीत सी.आर.पी.एफ १९१ वहिनी केरिपू बटालियन तर्फे सिव्हिल ॲक्शन प्रोग्राम-२०२४ अंतर्गत २० महिलांना महिलांना प्रशिक्षण देऊन सिलाई मशीन व प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमात १९१ वि वाहिनी चे नवीन कुमार बिस्ट उप कमा केरिपू बल,डॉ.अन्नथू एस सहा कमा केरिपू बल,निरीक्षक रेवा शंकर योगी केरिपू बल,निरीक्षक कलाने शरद डी केरिपू बल,अश्विनी नागरगोजे पोलिस उपनिरीक्षक एटापल्ली,शामराव बुटे प्राचार्य भगवंतराव कॉलेज एटापल्ली ,राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभपती नगरपंचायत एटापल्ली,निजाम पेंदाम नगरसेवक एटापल्ली,मडावी एस. टी गर्ल्स हॉस्टेल वॉर्डन उपस्थित होते.
१९१ वी वहिनी केरिपू बल तर्फे गरजू लोकांना वेळोवेळी मदत करून आरोग्य,शिक्षण व स्वच्छता यावर जन जागरूक सुद्धा करत असते.