मुरमाडी येथिल आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना कोंबडी सारखे कोंबून गावी रवाना #jantechaawaaz#news#portal#

76
प्रतिनिधी//

दोषी शाळा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी* :- कुणाल कोवे








गडचिरोली – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत येत असलेल्या मुरमाडी येथील अनुदानीत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना  शाळा व्यवस्थापनाने एका चार चाकी वाहणामध्ये २५ ते ३० विद्यार्थ्यांना कोंबड्यासारखे बसवून त्याच्या स्वगावी नेण्याचा प्रकार दि. 12/09/2023 ला चातगाव ते पेंढरी मार्गावर उघडीस आला. या विषया संदर्भात आज

















 दि. 13/09/2023 ला  आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास युवा परिषद, जनता दल युनाइटेड , मुमेंट फॉर जस्टिस, बि.आर.एस.पी, आदिवासी एकता युवा समिती,पोलिस बॉईज असोशीएशन व राजकीय पदाधिकारी यांनी गडचिरोली आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणात दोषी व्यक्तीवर बडतर्फची कारवाई करावी अशी मागणी निवेदना मार्फत करण्यात आली. यावेळी आदिवासी युवा विकास परिषदेचे कुणाल कोवे, उमेश ऊईके, सुधिर मसराम, राज बनसोड, गिरीश कोरामी, रुपेश सलामे, बादल मडावी, आदित्य येरमे उपस्थित होते.