माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश

76

अकरावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा वाढीव प्रवेशाचा प्रश्न मार्गी लागला, शिक्षण मंत्र्यांनी काढले आदेश
विद्यार्थी पालकांनी मानले श्रीमती फडणवीस यांचे आभार
मुल:   नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मुल येथील अकरावीच्या विज्ञान शाखेच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे, जवळपास 60 विद्यार्थ्यांच्या वाढीव प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला माजी. माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांनी शासनाकडे केलेल्या सतत च्या पाठपुराव्यामुळे अखेर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील विध्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागल्याने, आज सकाळी त्यांच्या निवास स्थानी भेट घेऊन विध्यार्थी आणी पालक वर्गांनी त्यांचे आभार मानले आहे.
दहावीचा निकाल लागल्यापासून अकरावीत विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी वंचित असलेल्या,  विद्यार्थि पालकांनी अथक प्रयत्न करूनही त्यांचा प्रश्न सुटत नसल्यामुळे गोरगरिबांचा प्रश्न मार्गी लावणाऱ्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन गेले. विद्यार्थ्यांचा भविष्याचा विचार करून श्रीमती फडणवीस यांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता त्वरित शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव संचालक उपसंचालक यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. अखेर शिक्षण मंत्री व शिक्षण सचिव माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या मागणीवरून चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या अकरावीच्या वाढीव प्रवेश निश्चित करण्यासाठी दिनांक 10 नोव्हेंबर 2022 ला आदेश काढला. त्यामुळे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला. आज सकाळी श्रीमती शोभाताई फडणवीस यांचे मुल येथील निवासस्थानी विद्यार्थी आणि पालकांनी भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले आहे.