नवेगाव ग्रामपंचात हदद्दीतील गोसाई मोहल्यात समाज मंदिराची मागणी

87

गोसावी समाजातील नागरिकांनी दिले आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदन

समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे निवेदकांना आश्वासन

दिनांक १२/११/२०२२ गडचिरोली

गडचिरोली जवळील नवेगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये गोसाई मोहल्यात या समाजाची संख्या बऱ्या प्रमाणात असून या ठिकाणी समाज मंदिराचे बांधकाम मंजूर करावे व त्याला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गोसाई समाजातील नागरिकांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

पण लवकरच या समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी निवेदकाना दिले

नवेगाव ग्रामपंचायतीला आपण आतापर्यंत कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असून गोसाई मोहल्यात देखील विविध विकासात्मक कामे केलेली आहेत . आपल्या मागणीची दखल घेऊन लवकरच या ठिकाणी समाज मंदिर उभे राहील यासाठी निधी उपलब्ध करून  देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी  निवेदन घेवून आलेल्या  समाजातील नागरिकांना दिले.