*शेतकऱ्यांना दिलासा!* आता हेक्टरी 40 क्विंटल प्रमाणे धान विकता येणार

79

ऑनलाइन नोंदणी साठी मुदतवाढही मिळाले*
मर्यादेत वाढ व्हावे यासाठी आ. धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रयत्न!
*शेतकऱ्यांनी आमदार व शासनाचे आभार मानले!*

*अहेरी:शासकीय धान खरेदीवर आता प्रतिहेक्टर 40 क्विंटल प्रमाणे धान खरेदी होणार आहे. शासनाने नुकतेच मंजूरी दिले असून ऑनलाइन पोर्टलवर डाटा अपलोड करण्याचे काम सुरु आहे.
    गडचिरोली जिल्ह्यात मुख्य व्यवसाय शेती असून धान हे प्रमुख पिक आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळा अंतर्गत शासकीय धान खरेदी केन्द्राच्या माध्यमातून हमी भावाने धान खरेदी केली जाते. जिल्ह्यात धानाचे हेक्टरी उत्पादन अधिक असल्याने 30 क्विंटल ही मर्यादा फार कमी होती.
     हेक्टरी मर्यादा वाढवून देण्यात यावे यासाठी शेतकरी अनेकदा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे निवेदन दिले. सदरचे शेतकऱ्यांचे मागणीचे पाठपुरावा शासनाकड़े करून आमदार धर्मराव बाबा आत्राम हे मागणी नेहमी लावून धरायचे , धान खरेदी करायची प्रति हेक्टरी  30 क्विंटल वरुण मर्यादा वाढवून 40 क्विंटल केल्याने तसे आदेश मंगळवार 15 नोव्हेबर रोजी काढण्यात आल्याने आता यापुढे नवीन आदेशानुसारच धान खरेदी केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

*आॅनलाइन नोंदणीसाठीही मुदतवाढ
     शासकीय धान खरेदी केन्द्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी करण्यासाठी 10 नोव्हेबर ही अखेरची तारीख होती.  परंतु जिल्ह्यातील नेटवर्क व लिंकिंग समस्या लक्षात घेता आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी संगणक परिस्थितीचे विदारक परिस्थिती लक्षात घेता ऑनलाइन नोंदनीची मुदतवाढ व्हावी यासाठीही धडपड केले असून 30 नोव्हेबर अशी मूदतवाढही मिळाली.  नोंदणी करण्यापासून वंचित असलेल्या असंख्य शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांनी सदरच्या दोन्ही निर्णयाचे स्वागत करून शासनाचे व आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे आभार मानले.