महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस तर्फे हळदी कुंकूचा कार्यक्रम गडचिरोली येथे घेण्यात आला

58

गडचिरोल्ली  : प्रदेश महिला काँग्रेस तर्फे *हळदी कुंकूचा* कार्यक्रम गडचिरोली येथे घेण्यात आला.प्रारंभीच्या काळात महिलांची सामाजिक कोंडी फोडण्यासाठीच प्रमुख मार्ग म्हणून समाज सुधारकांनी हळदी कुंकुम कार्यक्रमांची सुरुवात केली.या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांनी संघटित व्हावे, त्यांच्यात एकोपा वाढावा तसेच आपल्या संस्कृतीचे संवर्धन व्हावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने सहभागी झाले.या कार्यक्रमास महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस डॉ.चंदा कोडवते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाईन जी हकीम मॅडम, लीना पठाण मॅडम, तसेच शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा डॉ.अश्विनीताई धात्रक मॅडम, तसेच धानोरा नगरपंचायत अध्यक्षा पौर्णिमाताई सयाम मॅडम, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव भावनाताई वानखेडे, माझी जिल्हा परिषद सदस्य कविताताई भगत, माजी नगरसेविका लताताई मुरकुटे, पंचायत समिती सदस्य निषाताई आईतुलवार, रोजगार व स्वरोजगार विभाग कार्याध्यक्ष पुष्पाताई कुंभरे, तालुका अध्यक्षा मंगला कोवे, वैशालीताई ताटपल्लीवर, किरणताई रजनी, रजनी बरछा, वैशालीताई विधाते, दिपाली नागरे, आशा मेश्राम, मालताताई, आशा वेलादी, सुनीता रायपूरे, अपर्णा खेवले, सारिका ताडेवार, सीमा पेंदोरकर, वर्षा गुलदेवकर, नलिनी कोवे, संगीता सोनुले, असमा हकीम, गीता वाळके, आरती कंगाले, पौर्णिमा भडके, प्रेरणा गेडाम, पपीता चन्नावार, तसेच महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.