. 11 फरवरी चा जीआर रद्द करण्याकरिता मुंडन आंदोलनाचे आयोजन करून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

142

गडचिरोली | मार्च २०२६
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित असलेल्या JSW स्टील प्रकल्पासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) काढलेल्या भूसंपादन आदेशाचा स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे. ‘शेतकरी बचाव जन आंदोलन समिती’च्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी सरकारी आदेशाची जाहीर होळी करून आपला रोष व्यक्त केला. तसेच मुंडन आंदोलन करण्यात आले.
………………………….. भेंडाळा परिसरातील सुमारे १४ गावांमधील ९ हजार एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. ही जमीन वैनगंगा नदीकाठी असून अत्यंत सुपीक आणि बारमाही सिंचनाखाली आहे. वर्षभरातून तीन पिके घेणारे सधन शेतकरी या निर्णयामुळे भूमिहीन होण्याच्या भीतीत आहेत.
* अधिसूचनेला विरोध: प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट भूसंपादनाची अधिसूचना काढल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. अनेक गावांमध्ये ‘जमीन मोजणीसाठी कुणीही येऊ नये’ असे फलक लावून अधिकाऱ्यांना माघारी धाडले जात आहे.
* रोजगाराची अनिश्चितता: उद्योगामुळे विकास होईल असे आश्वासन दिले जात असले, तरी आष्टी येथील पेपर मिलच्या अनुभवावरून स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल की नाही, याबाबत शेतकरी साशंक आहेत.
शेतकरी बचाव जन आंदोलन समितीने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत भूसंपादनाचा हा अन्यायकारक आदेश रद्द केला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. वेळ पडल्यास प्रशासनाविरोधात तीव्र स्वरूपाचे ‘मुंडन आंदोलन’ आणि ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
शेतकरी बचाव जन आंदोलन समिती, भेंडाळा परिसर
शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणाऱ्या अन्यायी भूसंपादनाविरोधात गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे
१२ मार्च २०२६]
येथे शेतकरी बांधवांचा एक विशाल मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी सरकारकडून होणाऱ्या अन्यायी भूसंपादनाविरोधात आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे.
यावेळी समितीचे मार्गदर्शक संत परम पूज्य मुरलीधर महाराज कार्तिक स्वामी धाम, हरणघाट यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आज आपण येथे हौसेने जमलो नसून, आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध ही एक क्रांती आहे. इंग्रजांच्या काळातील पारतंत्र्याप्रमाणेच आज शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. शेती वाचली तरच स्वातंत्र्य आणि माणुसकी टिकेल.
शेतकरी समितीने यापूर्वीच आमदार, खासदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊन जमीन न देण्याचा निर्णय कळवला होता. तरीही सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करून ‘अधिग्रहणाचा अध्यादेश’ काढला आहे “शेती तर आम्ही वाचवणारच” हा निर्धार व्यक्त करत, जोपर्यंत हा अन्यायकारक अध्यादेश मागे घेतला जात नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री महेंद्र ब्राह्मणवाडे,यांनी दिला. समितीच्या नियोजनानुसार शांततापूर्ण मार्गाने मागणी करूनही सरकारने दखल न घेतल्याने, आता हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल.
या मेळाव्यात मनोज पोरते,विवेक भगत,दिगंबर धानोरकर,नरेंद्र जुवारे कुंदा जुवारे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. “अन्याय खपवून घेणार नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता
——————————