मुख्यसंपादक: एम सुरेश
सिरोंचा वरून रेगुंठा येणाऱ्या एस टी महामंडळ बस काल सायंकाळी 7:30 सुमारास कंबालपेठा गावाजवळ अट्टीवागू नाल्यात उलटला या अपघातात सुदैवाने कोणत्याही जीवितहानी झाली नाही.
कंबालपेठा गावाजवळील अट्टीवागू नाल्यावरी पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी तात्पुरता कच्चा वळण मार्ग तयार करण्यात आला आहे. रात्री अंधारात या वळणावरून जात असताना चालकाचा बसवरील नियंत्रण सुटला आणि बस थेट नाल्याच्या कडेला जाऊन एका बाजूला झुकली.बस नाल्यात पडणार अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
बस एका बाजूला लटकलेली असताना प्रवाशांनी प्रसंगावधान राखत खिडक्यांमधून आणि दरवाज्यातून बाहेर पडण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी एकमेकांना मदत करत सुरक्षितपणे बाहेर काढले. नाल्यात सुमारे 6 फूट पाणी असल्याने बस पूर्णपणे उलटली असती तर मोठी जीवितहानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
या एस टी बसमध्ये जवळपास 30 प्रवाशी होते.विशेष म्हणजे सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या टेकडा कंबालपेठा मार्गावरील कंबालपेठाजवळील अट्टीवागू नाल्यावरील पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असून पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे.







