नगराध्यक्षा रेखा मोहुर्ले यांची व्हॉइस ऑफ मिडिया साखळी उपोषणास भेट; जाहीर पाठिंब्याने प्रशासनावर दबाव

233

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली :एटापल्ली–देवदा –गडचिरोली,एटापल्ली–जारावंडी व एटापल्ली–हेडरी-गट्टा मार्गांची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन धोक्यात आले आहे. या रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे वारंवार अपघात घडत असून, अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र, ही परिस्थिती असूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

या पार्श्वभूमीवर एटापल्ली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रेखाताई मोहुर्ले व्हॉइस ऑफ मिडिया साखळी उपोषणाला भेट देत जाहीर पाठिंबा दर्शविले आहे. यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष गंभीर प्रश्नाची दखल घेत लवकरात लवकर संबंधित रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याबाबत प्रशासनावर दबाव आणण्याचे आश्वासन दिले.

रस्त्यांची दुरवस्था ही केवळ विकासाची अडचण नसून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी समस्या असल्याचे रेखाताई मोहुर्ले यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती उद्भवली असून, याची अनेक जिवंत उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

“नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,” असे ठाम मत व्यक्त करत नगररक्षा रेखा मोहुर्ली यांनी आपल्या उपोषणाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार जाहीर केला. त्यांच्या या आंदोलनाला नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत.

दरम्यान,नगराध्यक्षा च्या जाहीर पाठिंब्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, आता या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.