अतिदुर्गम पुनागुडा येथे क्रांतिसूर्य वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण

215

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली :अतिदुर्गम व आदिवासीबहुल भाग असलेल्या मौजा पुनागुडा (पंदेवाही), तालुका एटापल्ली, जिल्हा गडचिरोली येथे दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी महान स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिसूर्य वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या ऐतिहासिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. दिवाकर तलांडे (पोलीस पाटील) पुनागुडा होते. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. जुजा बक्का तलांडे (गाव भुमक) पुनागुडा, श्री.लखमा बापू तलांडे (भूमिया), श्री. सीताराम तलांडे (प्रतिष्ठित नागरिक) उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. संदीप तलांडे (शिक्षक) पुनागुडा, श्री. डोलेश तलांडे (शिक्षक) कर्रेम, श्री. गिरीश इष्टाम (शिक्षक) पुनागुडा तसेच सौ. पुष्पा गिरीश इष्टाम (शिक्षिका) पुनागुडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते म्हणून श्री. रामा कंगाली(शिक्षक) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुनागुडा यांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुनिता संदीप तलांडे (माजी सरपंच) पुनागुडा, सौ. अनिता दिवाकर तलांडे (अंगणवाडी सेविका) गैर्रा, कु. ज्योती गिरमा मडावी (अंगणवाडी सेविका) पुनागुडा, सौ. सुश्मिता संदीप तलांडे तसेच श्री. पियूष गिरीश इष्टाम यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या क्रांतिकारी विचारांचा, स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा तसेच आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी दिलेल्या बलिदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आजच्या युवा पिढीने त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन शिक्षण, एकता व राष्ट्रसेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश तलांडे व दौलत तलांडे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन विशाल मडावी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, युवक मंडळी, महिला व शालेय विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.
या पुतळा अनावरणामुळे पुनागुडा व परिसरातील नागरिकांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण होऊन वीर शेडमाके यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी राहतील, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.