एटापल्ली येथे खळबळजनक घटना – नव्या घराच्या शौच खड्ड्यात आढळले अनोळखी इसमाचे प्रेत

1454

एटापल्ली: शहरालगत असलेल्या नगर पंचायतच्या मागील भागात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
कुणाल तुदशीराम करमरकर यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असताना, घराच्या दुसऱ्या खोलीत तयार करण्यात आलेल्या शौच खड्ड्यात एका अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले.

ही बाब लक्षात येताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक गजानन साखरे हे आपल्या पोलिस पथकासह दाखल झाले. पाहणीदरम्यान शौच खड्ड्यात निर्वस्त्र अवस्थेत अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले.

प्राथमिक पाहणीत मृत्यू संशयास्पद असल्याचे संकेत असून, सदर घटनेमुळे परिसरात भीती व खळबळ उडाली आहे.
सध्या पोलिस उपनिरीक्षक गजानन साखरे व त्यांची टीम पुढील तपास करत आहे. मृत इसमाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.