एटापल्ली येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना पारंपरिक पद्धतीने पूजा विधी करून जयंती साजरी

111

एटापल्ली : 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर शहीद वीर बाबूराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या जयंती दिनानिमित्त औचित्य साधून एटापल्ली येथे आदिवासी पारंपरिक पद्धतीने पूजा विधी करुन मोठया उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. “वीर बाबुराव शेडमाके अमर रहे” “सेवा सेवा जय सेवा” असे नारे सुधा लावण्यात आले. १८५७ चे स्वातंत्र्यवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके ज्यांनी चंद्रपुर- गडचिरोली भागातील सावकार तथा इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता.गडचिरोली व चंद्रपुर येथील गोंड तथा इतर गैर गोंडियन समाजास सावकारांच्या जाचातून त्यांच्या हूकूमशाही व अत्याचारातून सुटका करून देण्या करिता वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी प्रत्येक समाजातील तरून युवकांना सोबत घेऊन जंगोम सेना तयार केली व सावकार आणी इंग्रजांच्या विरूद्ध लढाई सुरू केली. बाबुरावांना व जंगोम सेनेला भरपुर यश मिळाले होते. आयोजित कार्यक्रमाला उपस्थित गावचे गोटूल समिती अध्यक्ष अक्षय पुंगाटी, सचिव लोकनाथ गावडे, ऑ. इं. आ. ए. फेडरेशन तालुका शाखा एटापल्ली चे अध्यक्ष श्री. भिवाजी मडावी सर, भिवाजी कुळयेटी सर, दुलसाजी पुंगाटी, गोटा सर, आदिवासी युवा समितीचे अध्यक्ष शुभम रापंजी, नगरसेविका तारा ताई गावडे, पाणी पुरवठा सभापती नामदेव हिचामी, अनिकेत हिचामी, विक्की कोरामी आदी सर्व गावातील प्रतिष्टीत नागरिक, आदिवासी समाज बांधव, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.