बेंबाळ येथे परिवर्तनातुन परिवर्तनात होणारे परिवर्तन #jantechaawaaz#news#portal#

43

बेंबाळ येथे नाली बांधकामात अनियमितता
 ग्राम पंचायत बेंबाळ चे मध्यामतून होत असलेल्या नाली बांधकाम बरीच अनियमितता दिसून येत असून बेंबाळ मध्ये झालेला परिवर्तन हा केवळ काही ठेकेदारी करणाऱ्या लोकांसाठी आहे की काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडलं आहे .
 
चेहरे बदलले पण परिस्थितीत बदल होत असलेलं दिसून येत नसून सरपंच चांगदेव जी केमेकर यांना या बाबत विचारणा केली असता बघतो सांगतो अशी भूमिका घेतली आहे वास्तविक काम सुरू होऊन बरेच दिवस उलटले असून गावातील सरपंच याबाबत अनभीज्ञ आहे याचे नवल वाटत असून यात आतून व्यवहार होत 
तर नसेल अशी शंका सामान्य जनतेच्या मनात दिसून येत असून संबधित कामाचं ठेका ही ग्रामपंचायत करत आहे तरी सरपंच अश्या पद्धतीने बोलत असल्याने यात भ्रष्टाचार होताना स्पष्ट दिसून येत आहे याबाबत ग्रामपंचायत बेंबाळ चे सदस्य आशा शेंडे ,
यांचे घराजवळ काम सुरू असून त्यांनी याबाबत फारसे बोलले नाही.
कामात मोठ्या प्रमाणत होत असलेली अनियमित ची रीतसर चौकशी साठी संवर्ग विकास अधिकारी मूल यांचे कडे लवकरच तक्रार दाखल करण्यात येणार या कामाची चौकशी करून जबाबदार ठेकदार वर गुन्हा दाखल करण्याची मागणी जनतेकडून करण्यात येणार आहे