अमोल कुळमेथे यांच्या नेतृत्वात कैकाडी समाज नगर, शिव नगर, समता नगर येथील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

26

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

गडचिरोली:- महायुती सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार तसेच गडचिरोली जिल्ह्याचे विकास पुरुष माझी कॅबिनेट मंत्री व आमदार मा. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अमोल कुळमेथे यांच्या नेतृत्वात मंगळवार 11 फरवरी ला गडचिरोली दलित वस्ती मधील समता नगर, शिव नगर, कैकाडी समाज वस्तीतील विविध वार्डातील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.नवीन कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य मा. रविंद्रजी वासेकर यांनी दुपट्टे टाकून स्वागत केला. यावेळी नगर सेवक नगर पंचायत चामोर्शी लौकिक भिवापुरे, हरिष राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नेत्या सोनलताई कोवे, यांच्या उपस्थितीत
सुनील जगन्नाथ, रामा कंडेलवाल
गोपाल जगन्नाथ, गुरुदेव केदारी, समय्या कुंभारे, सारय्या कुंभारे, राजू जगन्नाथ, अविनाश जाधव, डॅनियल कंडेलवाल, इसराइल कुंभारे, अक्षय जगन्नाथ, कल्पना प्रकाश जाधव, उज्वला कुंभारे, लक्ष्मी जगन्नाथ, सरिता उभया कंडेलवार, पापम्मा नारायण जगन्नाथ, वंदी गुरुदेव केदारी, वच्छला समय्या कुंभारे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला..
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, युवा नेते अजय कुकडकर, ओ. बी.सी जिल्हाध्यक्ष संजय शिंगाडे, भटक्या जमाती जिल्हाध्यक्ष किशोर बावणे, जितेंद्र दुधे सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते…