सिरोंचा येथील कलेक्टर आंब्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार #jantechaawaaz#news#portal#

58

– गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात आढळणारा कलेक्टर आंबा यावेळी जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना भेट म्हणून दिला. यावेळी प्रधान सचिव यांनी या आंब्याचे जीआय मानांकन घेऊन आंब्याची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवावी अशा सूचना कृषी अधिकारी यांना दिल्या.
 गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा व अहेरी या भागात कलेक्टर आंबा या प्रजातीची 800 ते 1000 झाडे असून यातून स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत 
असते. जी आय मानांकनासाठी कृषी विभागाकडून प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर याची विक्री करणे त्यामुळे सोपे जाणार आहे.