प्रतिनिधी// रूपेश सलामे
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
गडचिरोली- दि. २५/८/२४ रोजी श्रृष्टी सेलिब्रेशन हॉल नवेगाव, गडचिरोली येथे राज्यात रडखडलेली पेसा भरती व अन्य समस्यांना घेऊन जिल्ह्यातील आदिवासी बांधव, समाजसेवक, ग्रामसभां चे प्रमुख पदाधिकारी, सरपंच तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकाऱ्यांची सभा आदिवासी समाज सेवक देवाजी तोफा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेमध्ये खालील मुद्यांवर 1. दि. 6 जुलै 2017 रोजीच्या मा. SC च्या बोगस आदिवासी संदर्भात दिलेल्या निर्णयाचे पालन करावे 2. 12500 पदभरती तात्काळ करावी. 3. पेसा पद भरती तात्काळ बिना अटी मध्ये पूर्ण करावी. 4. आदिवासी समाजाचे बोगस जात प्रमाणपत्र घेऊन नोकरी घेतलेल्यांवर कडक कारवाई करून फौजदारी खटला दाखल करावा. 5. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेल्या st, sc, obc आरक्षण वर्गीकरण निर्णय, 6. संसदेने परित केलेल्या नविन वन अधिनियम कायदा, 7. TRTI आयुक्त राजेंद्र भारुड साहेब यांची बदली करू नये. व खोटा गुन्हा रद्द करावा. आदि विषयांवर चर्चा करुन लवकरच मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा. राज्यपाल यांना डेलीगेशन देण्याचे ठरविण्यात आले. सभेला उमेशभाऊ ऊईके, लालसु नागोटी, एड. ताराम सर, कुणाल कोवे, नितीन पदा, गुलाबराव मडावी, प्रियदर्शन मडावी, आदिनी मार्गदर्शन केले. सभेला मुकुंदा मेश्राम, गणेश मट्टामी, ज्ञानेश्वर राणे, एस. बी. कोडापे, सतिश कुसराम, अनिल केरामी, प्रदिप बोगा, स्वप्निल मडावी, शिवाजी नरोटे, नंदू मट्टामी, रामा तुमरेठी, केशव कुळयेटी, बाजीराव हिचामी, सुधाकर गोटा, शाम कुळमेथे, संजय कुमरे, सनकु पोटावी, कोतुराम पोटावी, रविन्द्र कोवे, छबिलदास सुरपाम, अनिल नरोटे, बाजीराव नरोटे, मयुर कोडापे, बाजीराव वाल्को, इरपा मडावी, तेजस गव्हारे, मयुर कुनघाडकर, काशीनाथ कांदो, गिरीष जोडे, शुभम किरंगे, धिरज जुमनाके, संतोष गोसावी, मोहन कुमरे, सुरेखा मडावी, पुष्पा कुमरे, चेतना कन्नाके, मिना किरंगा, ज्योती जुमनाके, निरुपा आत्राम, बादल मडावी, अक्षय वाढई, आदित्य येरमे, विक्रांत आतला, एड. विवेक मसराम, गणेश वरखडे, नुतन वड्डे, अमिता हलामी, मधुकर पोटावी, देवाजी मट्टामी व कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड, कुरखेडा, चामोर्शी, गडचिरोली, अहेरी, तालुक्यातील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.







