अरे बापरे लॉयड्स मेटल सुरजागड कंपनीच्या वाहनाने इसमाला धडक

109

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी //

एटापल्ली:- दि. ३०/०१/२०२४ रोजी लॉयड्स मेटल कंपनीच्या वाहनाने श्री नामदेव कुंभारे वय 70 वर्ष यानां जोरदार धडक दिली. या अपघातात श्री.नामदेव कुंभारे गंभीर जखमी झाले आहे तरी झालेल्या अपघातामध्ये कसल्याही प्रकारची पोलीस तक्रार झालेली नाही. सदर प्रकरण मध्ये शिवसेना (उ.बा.ठा.) तालुका प्रमुख मनीष दुर्गे यानी उपचार साठी पुढ़ाकर घेऊन श्री संजय चांगलानी लॉयड्स मेटल कम्पनी चे सहकारी कर्मचारी याना फोन द्वारे संपर्क करून रुग्णाला कुबेर हॉस्पिटल चंद्रपुर येथे पुढ़िल उपचारसाठी हलाविन्यात आलेले आहे. लॉयड्स मेटल कम्पनी चे सहकारी कर्मचारी श्री. संजय चांगलानी यानी संपूर्ण उपचाराचा खर्च कंपनीच्या वतीने देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. यापुढे कंपनीच्या वाहनाने अपघात घडल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.