एटापल्ली :दिनांक २६ जानेवारी २०२४ रोज शुक्रवार ला बंगाली कॅम्प कालीमाता मंदिर जवळ भारतीय जनता पार्टी तालुका शाखा एटापल्ली तर्फे74व्या lप्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम मोठया उत्साहात घेण्यात आले,
या कार्यक्रमामध्ये ध्वजारोहण श्री विजय नल्लावार जिल्हा सचिव भाजप यांच्या शुभहस्ते करण्यात आले,व संदीप भाऊ कोरेत भाजप आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष हे अध्यक्ष स्थानी उपस्थित होते अध्यक्ष स्थानावरून बोलताना संदीप भाऊ बोलले 150वर्षांच्या गुलाम गिरीतून 15आगस्त 1947रोजी भारत जरी स्वांत्रत झाला असेल तरी तो चालवला जाणार याबाबत कोणताही अधिकृत ठरले नव्हते पण याच दिवशी न्याय समता बंधुता राष्ट्रांची एकता व एकात्मता हि मूलभूत उद्दिष्टे तर सर्वभोम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य हे राजकीय व्यवस्थेचे स्वरूप निश्चित करण्यात आले सोबतच संविधानाने दिलेल्या ज्या नियमांच्या आधारे आपला देश चालवला जातो. या नियमांना संविधानाच्या भाषेत ‘कायदे’ म्हटले जाते. आपले हक्क, कर्तंव्य, आपली राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था सारे काही संविधानातील याच कायद्यांआधारे चालते.
हे कायदे संविधानाच्या रुपात 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आले आणि भारत देश प्रजासत्ताक झाला. त्यामुळे आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून दरवर्षी उत्साहात साजरा करतो. असे बोलले
*यावेळी भाजप जेष्ठ नेते अशोकजी पुल्लुरवार, जेष्ठ नेते विनयची बाला,भाजप विशेष निमंत्रित सदस्य नवीनजी बाला,अचिंत सरकार,मनीमोहनजी मंडल,विभुती सरकार, युवा मोर्चा कार्यकर्ते अनुज बाला,भाजप तालुका महामंत्री प्रसाद भाऊ पुल्लुरवार, नगरसेवक दिपकजी सोनटक्के, नगरसेविका रेखा ताई मोहुर्ले, नगरसेविका निर्मलाताई कोंडबत्तुलवार, नगरसेवक बिरजु तिम्मा, व ईतर नागरिक उपस्थित होते*