पंतप्रधान रोजगार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आमंत्रीत

57

अहेरी: पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत ग्रामिण भागात 2022-23 या आर्थीक वर्षांत 25 लाख प्रकल्प मर्यादेपर्यत उद्योग उभारण्यासाठी  जिल्ह्यातील  सुशिक्षीत बेरोजगार तरूण उद्योजकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत ग्रामिण व शहरी भागातील तरूणवर्गाला व पारंपरिक कारागीरांना एकत्रीत करून स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे खेड्यापाड्यातून शहराकडे  येणाऱ्या  बेरोजगारांचे व पारंपारीक कारागीरांचे स्थलांतर थांबविणे  ग्रामिण भागात रोजगार वाढीस मदत करणे हा या योजनेचा मुख्य उदेश आहे. या योजनेतर्गंत उत्पादन प्रक्रिया  उद्योगासाठी प्रकल्प  किंमतीच्या 25 व 35 टक्के रक्कम मार्जिन मनी (अनुदानस्वरूपात) देण्यात येते. उत्पादन प्रक्रिया असलेल्या प्रकल्पामध्ये प्रकल्प किंमत 10 लाखापेक्ष जास्त असल्यास तसेच आवश्यक आहे. अर्जदाराचे किमान वय 18 वर्ष पुर्ण असणे आवश्यक असून अर्जदाराने केंद्र राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. केवळ नविन उद्योजक, कारागीर व बचत गट या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे. या योजनेत अर्ज ऑनलाईन स्विकारले जात असून www.kviconline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज व योजनेची संपुर्ण माहिती उपलब्ध आहे. या योजनेचा अर्ज तसेच अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 07184-252521 वर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जांभुळकर निवास, बाबा मसस्तानशाहा वार्ड,  भंडारा या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.