वडसा-देसाईगंज तालुका कॅांग्रेस कमिटीने भारत जोडो यात्रेत सम्मिलित होण्याच्या अनुषंगाने नियोजन बैठक

72

तालुका कॅांग्रेस मेळाव्याचे आयोजन केले. सभेत भारत जोडो पदयात्रेत येत्या १७ नोव्हेंबर रोजी पातुर येथे सम्मिलित होण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली व जास्तीत जास्त संख्येने उपस्थीत राहण्याचे ठरले. या प्रसंगी तालुक्याचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष राजेन्द्रजी बुल्ले यांचा पदग्रहण सोहळा सुद्धा पार पडला. सभेला महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॅा. नामदेव किरसान, सभेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, उद्घाटक माजी आमदार आनंदरावजी गेडाम, जेसाभाई मोटवानी, माजी तालुकाध्यक्ष परसरामजी टिकले, राजेन्द्रजी बुल्ले यांनी सम्बोधित केले. यावेळी मंचावर  प्रदेश सचिव नितिन कोडवते, राजुभाऊ रासेकर, यादवरावजी ठाकरे, आरतीताई लहरी, अब्दुल भाई रिझवी, नन्दुजी नरोटे, हरिषजी मोटवानी, नितिनजी राऊत, आनंदरावजी आकरे, आरीफ भाई, विनोदजी नाकाडे, पिंकुजी बावने विराजमान होते व मोठ्या संख्येंने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.