पोलीस मदत केंद्र मरपल्ली येथील बिरसा मुंडा जयंती निमित्त व्हाॅलीबाॅल स्पर्धा आयोजन

79

पोलीस मदत केंद्र मरपल्ली येथे मा. श्री. निलोत्पल सा.,पोलीस अधिक्षक, गडचिरोली मा.श्री. अनुज तारे सा. अपर पोलीस अधिक्षक, अभि यान, मा. श्री. कुमार चिंता सा. अपर पोलीस अधिक्षक,गडचिरोली यांच्या संकल्पनेतून तसेच मा. सुजीतकुमार क्षीरसागर सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून *दिनांक  15/11/2022 रोजी “विर बिरसा मुंडा जयंती” निमीत्त “भव्य  बिरसा मुंडा व्हॉलीबॉल” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.*
       सदर कार्यक्रमाचे उद्घाटन   मा.श्री. अरूण वेलादी, सरपंच मरपल्ली यांनी केले. सदर स्पर्धेची सुरूवात भगवान बिरसा मुंडा  यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन  व दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. सदर कार्यक्रमास हनुमंत कोरेत, माजी सरपंच करंचा, रतन दासर, प्रतिष्ठित नागरीक, मरपल्ली, घनशाम वेलादी, भस्वापूर, हे मान्यवर उपस्थित होते.

सदर स्पर्धेची सुरूवात मान्यवरांच्या  उपस्थितीत बाॅल, नेट व ग्राऊंड चे पुजन करून करण्यात आले.
             सदर व्हॉलीबॉल क्रीडा  स्पर्धेकरिता पोमके मरपल्ली हद्दीतील मरपल्ली, भस्वापूर,भस्वापूर टोला,सुध्दागुडम,मोंडीगुट्टा, जोगनगुडा,तिमरम, रेगुलवाही, दुब्बागुडम, करंचा, मोतुकपल्ली गावातील *एकूण 16 व्हॉलीबॉल संघांनी* उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमास 180 ते 200 खेळाडू व प्रेक्षक उपस्थित होते. सदर संघाचे दोन गट करुन साखळी पद्धतीने अतिशय खेळीमेळीच्या वातावरण स्पर्धा खेळविण्यात आल्या..
दि. 16/11/2022 रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्यात प्रथम बक्षीस – भस्वापूर टोला, 3000₹
व्दितीय बक्षीस – दुब्बागुडम 2000₹
तृतीय बक्षीस – रेगुलवाही 1000₹
  तर  टीम मोंडीगुट्टा – 1000 उत्तेजनार्थ
बेस्ट स्मॅशर – राम टीम भस्वापूर टोला 500₹
बेस्ट डिफेन्स – मुकेश टीम दुब्बागुडम 500₹ असे बक्षीस देण्यात आले.

         यावेळी आम्ही प्रभारी अधिकारी पोउपनि. संतोष जायभाये यांनी उपस्थित खेळाडूंना शासकीय योजना,आगामी पोलीस भरती व दादालोरा  खिडकी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत माहिती दिली..पोउपनि. प्रविण सोनवणे,  पोउपनि. महाजन मैसनवाड ,व पोउपनि. सांगवे  SRPF ग्रुप 7 दौंड, सर्व जिल्हा पोलीस अंमलदार, SRPF अंमलदार यांनी  संघभावनेने परिश्रम घेतले. सदर स्पर्धेत उपस्थित नागरिकांची व खेळाडूंची अल्पोपाहार, चहा व पाण्याची व्यवस्था  करण्यात आली होती..