अहेरी येथील बेघर कॅलनीतील इंदिरा नगर येथील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था होती पावसाड्यात त्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना पायाचे गुडघ्या पर्यंत चिखलात पाय फसवत तर शाळेतील लहान मुलांना जीव मुठीत टाकून घरी जावे लागत असे या मूलभूत समस्याचे समस्याग्रस्त लोकांना घेऊन सामाजीक कार्यकर्ते सचिन येरोजवार यांनी मागील दोन वर्षपासून नगर पंचायत अहेरी येथे सातत्यपूर्ण पुरवठा केल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले असून बेघर कॅलनीतील त्या रस्त्याच्या बांधकाम पूर्णत्वास येऊन आज तेथे सिमेंट क्रांकीटचा रास्ता तयार झाला आहे त्यामुळे प्रभागातील लोकांना पावसाळया पूर्वी मोठा दिलासा मिळाला असून वाहतुकीची सुविधा सुधारली आहे नागरिकांनी बेघर कॅलनीतील समस्याग्रस्त लोकांनी सामजिक कार्यकर्ता सचिन येरोजवर यांचे कार्याचे कौतुक करत मनपूर्वक आभार मानले नागरिकांच्या मूलभूत समस्यांचा निकरणासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना ही नागरिकांनी वेक्त केली आहे







