बहुजन मुक्ती पार्टी तर्फे स्मार्ट मिटरच्या विरोधात धरणे आंदोलन

31

गडचिरोली _ बहुजन मुक्ति पार्टी तर्फे स्मार्ट मिटरच्या विरोधात धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले . यामध्ये प्रमुख मागण्या स्मार्ट मिटर हे बंद करण्यात यावे . खाजगी ठेकेदार या मुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लुटमार करत आहेत. यामुळे रोजगार मिळणार नाही . घरेलू गॅस तसेच कमर्शिअल गॅस यांचे भाव कमी करावे . सिलेंडर गॅस साठी जनतेला बराचवेळ लाईन मध्ये उभे रहावे लागते. . तरिपण मिळत नाही . वितरकावर सरकारचे नियंत्रण नाही . पेट्रोल डिझेलेचे भाव मोठ्याप्रमाणत वाढले आहेत . त्यामुळे जनतेची आर्थिक लुट होत आहे .
यासाठी प्रमुख मागण्या स्मार्ट मिटर पारदर्शी असावे व खाजगी कंत्राटदारांना देऊ नये . घरेलू गॅसची किंमत ४०० रुपये तर कमर्शिअल गॅसची किंमत ७०० रुपये असावी . पट्रोल डिझेलच्या किंमती ७०रु ते ९० रु प्रतिलिटर असावे .
हे पहिल्या चरणातील आंदोलन असून मागण्या पूर्ण न झाल्यास यानंतर पुन्हा दुसऱ्या व तिसऱ्या चरणात आंदोलन करण्यात येईल .
निवेदन देतेवेळी बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर , बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा प्रभारी डोमाजी गेडाम , सचिव प्रमोद राऊत , कोषाध्यक्ष नरेंद्र शेंडे , आदिवासी नेते कुणाल कोवे , ॲड . मिनाल खोब्रागडे , आदिवासी विकास युवा परिषद मिडीया प्रभारी रुपेश सलामे , बादल मडावी , प्रेमदास रामटेके श्रीरंग उंदिरवाडे उपस्थित होते .