नक्षल कमांडर हिडमाच्या गाण्यावर थिरकणे पडले महागात: एटापल्लीत पाच जणांवर गुन्हा दाखल

739

एटापल्ली //प्रतिनिधी

दिंनाक 07/05/2026 रोजी एटापल्ली पोलिसांना मोबाईलवर सोशल मिडीयाद्वारे माहिती मिळाली की सी.पी.आय माओइस्ट या संघटनेच्या पिपल्स गोरीला तिबरेशन आर्मी यांच्या बटालियन नं. 1 कमांडर हिडमा माड़वी यांच्या जिवनचरीत्रावर आधारित गाणे असलेला एक व्हिडीओ मौजे कृष्णा तालुका युटपली येथील लग्न समारंभामध्ये वाजवून त्यावर ती 40 ते 50 तरुण तरुणीने नृत्य केला आहे. सदर व्हिडीओचे अवलोकन केले असता, त्यामध्ये “हमारे हक की जंग है हिडमा, दिल की बस्तीमे है हिडमा, हमारी हिंमत तु ही हिडमा, फुलो ने तुझे जन्म दिया” असे असे संपूर्ण गाणे त्यामध्ये वाजवल्याचे दिसून आले. आ . सदर बाबत एटापल्ली पोलिसांनी तात्काळ खात्री केली असता, असे समजले की, कृष्णार येथील संदिप बाजीराव हिचामी यांचे लग्न असल्याने त्यानी शंकर हिचामी यांच्या मालकीचा डी.जे. लावुन पारंपारिक आदिवासी नृत्य माधव वड्डे यांच्या साधं वाडित चालु होते. एटापल्ली पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर डी.जे. वर ऑपरेटर म्हणून काम करणारे आर्यन हिचामी व शरद कांदो गाणे वाजविले असून ऑपरेटर यांनी सदरचे संपुर्ण गाणे वाजवुन भारताची सार्वभौमता, एकात्मता व अखंडता धोक्यात आणण्यासाठी दिशाभूल करणारी माहिती गाण्याद्वारे वाजवली असल्याने नमुद कृत्य करणारे शंकर हिचामी,बाबुराव कांदो, आर्यन हिचामी, चैतु तेलामी,शरद कांदो यांचे वर भारतीय न्याय संहिता व मुंबई पोलीस अधिनियम अन्वये पोलीस स्टेशन एटापल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गाणे वाजवण्यामध्ये त्यांचा कोणता उद्देश होता व आणखी यामध्ये कोण कोण सहभागी आहेत यांचा शोध घेऊन पुढील कारवाई एटापल्ली पोलीस करीत आहेत. कोणत्याही नागरिकाने असे गाणे वाजवून समाजात संभ्रम निर्माण करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आव्हान एटापल्ली पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.