हेडरी येथे लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीगला सुरुवात 16 गावांच्या संघांचा सहभाग; ग्रामीण क्रिकेट, सामुदायिक एकता आणि युवा प्रतिभेला चालना

116

अमित कत्तीवार
तालुका प्रतिनिधी

एटापल्ली: तालुक्यातील
हेडरी येथे लॉयड्स स्पोर्ट्स अकॅडमी मैदानावर मंगळवारी बहुप्रतिक्षित ‘लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग’ (एलव्हीपीएल) क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभकरण्यात आला.ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि गावागावांत क्रीडा संस्कृतीला चालना देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेची संकल्पना साकारण्यात आली आहे. ग्रामीण
युवकांना त्यांच्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी प्रभावी मंच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.

उ‌द्घाटनप्रसंगी बोलताना बी. प्रभाकरन म्हणाले, ‘लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून ग्रामीण प्रतिभा आणि सामुदायिक एकतेचा उत्सव आहे. या उपक्रमातून युवकांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासोबतच तळागाळातील क्रीडा अधिक बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले. उद्घाटनसोहळ्याला परिसरातील गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रमाला सामुदायिक उत्सवाचे स्वरूप प्राप्तझाले.

यावेळी पुरसलगोंदीचे उपसरपंच राकेश कवडो ,उडेरा ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश गोटा, विविध पोलीस अधिकारी, गाव पाटील तसेच पोलीस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण भागातील क्रीडा विकासासाठी अशा स्पर्धांची गरजअसल्याचे मत व्यक्त केले.या स्पर्धेत १६ गावांचे संघ सहभागी झाले असून त्यांना चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. लीग सामने ६ मेपासून सुरू झाले असून परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

‘आपलं गाव, आपले खेळ’ आणि ‘एक संघ, एक गाव, एक जिद्द’ या घोषणांनी उ‌द्घाटन सोहळ्याला विशेष रंगत आणली. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांनाही उपस्थितांची दाद मिळाली.उ‌द्घाटनाच्या दिवशी लॉयड्स क्रिकेट टीम आणि ऑल ग्रामीण इलेव्हन यांच्यात मैत्रीपूर्ण सामना खेळविण्यात आला. सहा षटकांच्या रोमांचक सामन्यात लॉयड्स संघाने दमदार विजय मिळविला.एलव्हीपीएलमधील सर्व सामने हेडरी येथील लॉयड्स स्पोर्ट्स ग्राउंडवर खेळविण्यात येणार असून ही स्पर्धा ग्रामीण भागातील युवा सक्षमीकरण, सामुदायिक ऐक्य आणि तळागाळातील क्रीडा विकासाचे प्रतीक ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे