भामरागड तालुक्यातील शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या नरेश रैनू मटामी वर्ग 9 च्या विद्यार्थ्यांवर दिनाक 17/02/2026- रोज मंगळवाला सायकाळी जेवणा नंतर खेळत असताना 50 रु हरवले असता शाळेतील अधीक्षक सागर शामराव अमनेरकर
यांना सांगण्यासाठी गेली असता त्या विद्यार्थ्यांना काही विचारपूस न करता मोठ्या काडीने व हाताने खूप मारहाण केला
मारहाण इतकी होती की तो विद्यार्थी लगेच बेशुद्ध पडला त्यानंतर आश्रम शाळेतील मुख्याध्यापक व इतर शिक्षकाने एकमत करून त्याला वर्ग नऊच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी घेऊन गेले त्याच्यानंतर त्याला जाग आली पाय खूप सुजलेला होता हात पाय खूप सुजलेले होते झोप लागत नसल्यामुळे खूप लढत होता नंतर कसतरी झोपी गेला सकाळी उठल्यानंतर असा खेळतील अधीक्षक त्यांच्याकडे आले खूप धमकी दिली तुझी टीसी पण तू घरी जा तू पुन्हा येऊ नको असे तो धमकावला त्यामुळे विद्यार्थी दोन महिने शाळेमध्ये हजर नव्हता आज कोटी येते छञपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवली असता अपर जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली व मा.तहसीलदार साहेब भामरागड यांनी आले असता पीडित विद्यार्थी व पालक आले असता . आदिवासी विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित अधीक्षकाकडून व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना किरकोळ कारणांवरून मारहाण करणे, अपमानास्पद भाषा वापरणे तसेच भीतीचे वातावरण निर्माण करणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थ्याला निर्दयपणे मारहाण करण्यात आली असून त्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. या घटनेमुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचा त्यांच्या शिक्षणावर व मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम होत आहे.
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि अनुकूल वातावरण मिळत नसून, काही शिक्षकांकडून अमानुष वागणूक दिली जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी दिनांक 10/04/2026 रोजी अपर जिल्हाधिकारी गडचिरोली व मा. तहसीलदार साहेब भामरागड अधिकाऱ्यांकडे तत्काळ अधीक्षक सागर शामराव अमनेरकर यांना निलंबन करावी व ॲट्रॉसिटी ॲक्ट फोक्सो ॲक्ट नुसार कारवाई करून अशी लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. व साहेबांनी योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले.
या प्रकरणात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, तालुका अहेरी अध्यक्ष डॉ. नामदेव पेंदाम व युवा सचिव महाराष्ट्र अॅड. राकेश तोरे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, विद्यार्थ्यांच्या हक्कांवर कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही. दोषींवर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित अधीक्षक व शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.







