शहस्त्रबाहु अर्जुन महाराज पुजन सोहळा: कलार समाजातर्फे मानापूर येथे भव्य आयोजन

197

मुख्यसंपादक सुरेश मोतकुरवार

गडचिरोली, [०५/०१/२०२६]: कलार समाज, मौजा मानापूर यांच्या वतीने दि. ०५/०१/२०२६ रोजी शहस्त्रबाहु अर्जुन महाराज पुजन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा आरमोरी तालुक्यातील मानापूर येथील श्रीराम मंदिराच्या मागील बाजूस झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दि. ०४/०१/२०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता ग्रामसफाईने झाला, त्यानंतर सायंकाळी ४:०० वाजता घटस्थापना आणि रात्री ८:०० वाजता श्रीराम भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.
सोमवार, दि. ०५/०१/२०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता शोभायात्रा काढण्यात आली. दुपारी १२:१५ वाजता भगवान शहस्त्रबाहु यांच्या प्रतिमेचे पुजन आणि ध्वजारोहण झाले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे आगमन, उद्घाटन सोहळा आणि स्वागत समारंभ करण्यात आले. सायंकाळी ४:०० वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. श्री. भुषणभाऊ समर्थ साहेब (गडचिरोली) उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मा. श्री. रविंद्रजी गोटेफोडे (माजी नगराध्यक्ष कुरखेडा) होते.
या कार्यक्रमाला कलार बांधव तसेच गावकरी मंडळी उपस्थितीत होती