सिरोंचा :- सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा- आसरअल्ली राष्ट्रीय महामार्ग हायवे क्र. 63 वर गेल्या तीन महिन्यापासून महामार्गावर अपघातेची प्रमाण वाढली आहे. आरडा, लंबडपल्ली आणि तुमनुर या गावाजवळील महामार्गावरील असलेल्या वळण (टर्निंग) येथे अपघात होऊन काही इसमाच्या जीवे गेली आणि काही इसमे गंभीर जखमी झाले आहे.
येत्या काही दिवसात अनेक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, दोन दिवसात एकतरी अपघातेची घटना घडत असून या समस्ये व अपघातेची प्रमाण कमी करण्याची उपाय योजना म्हणून महामार्गावर गतीरोधक (स्पीड ब्रेकर )
लावुन त्या ठिकाणी गतिरोधकाची सुचना बोर्ड ही लावण्यात यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता – सागर भाऊ मूलकला, यांच्या नेतृत्वाखाली मूलकला मदत फाउंडेशनचे कार्यकर्तासह ,परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,