दिं.०६ मार्च २०२३
गडचिरोली:- मा.खासदार अशोकजी नेते यांच्या निवासी कार्यालय गडचिरोली येथे आज होळी व धुलिवंदनाचे औचित्य साधुन खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन रा.ऐलचिल ता. अहेरी . जि.गडचिरोली येथील श्री.सोनम मारोतराव पुंघाटे यांच्या समेत अनेक युवा वर्गातील पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला.
त्यावेळी सोनम मारोतराव पुंघाटे, धुलिचंद धुर्वे, दिपक माली, अक्षय कुळमेथे,ईश्वर मडावी,बालाजी कावळे,पाथाडी कावळे,सुनिल वरखडे,लालु मडावी,तसेच ऐलचिल येथील अनेक युवा वर्ग सुध्दा प्रक्ष प्रवेश करणार आहेत.असे सोनम पुंघाटे यांनी विशवास दर्शविला.
पक्ष संघटनेचे काम व पक्ष वाढवण्याच्या कामाला जोमाने लागा, संघटनेचे काम मजबूत करा. असे खासदार अशोकजी नेते यांनी पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा देत केले.