मासीक पाळी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन आणि सॅनेटरी पॅडचे वितरण #jantechaawaaz#news#portal#

90

प्रतिनिधी//
पाळी म्हणजे स्त्रीचे गुणधर्म, मासीक पाळी बद्दल अजूनही आपल्या समाजात गैरसमज आहेतच. मासीक पाळी बद्दल शास्त्रीय ज्ञान देण्यासाठी आज दिनांक 25/4/2023 ला होप फॉऊडेशन सिरोंचा तथा लोकमंगल संस्था, घोट यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमंगल संस्था घोट येथील बालसदन हालमध्ये उपस्थित किशोरवयीन मुली आणि महिलांना मासीक पाळी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन तसेच सॅनेटरी पॅड वितरण करण्यात आले.
      यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अधीक्षक निर्मला टेप्पो, प्राजक्ता फापनवाडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून होप फॉऊडेशन सिरोंचाचे संचालक नागेश मादेशी  उपस्थित होते.
       यावेळी उपस्थित किशोरवयीन मुली आणि महिलांना मासीक पाळी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. 30 किशोरवयीन मुलींना सॅनेटरी पॅड वितरण करण्यात आले.