लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून १२ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झालेल्या कुटुंबियांना न्याय मिळवून ध्या #jantechaawaaz#news#portal#

39

प्रतिनिधी//
;संबंधितांवर कठोर कारवाई करा ,सामाजिक कार्यकर्ता – सागर मुलकला यांची मागणी 
 सिरोंचा:- काल रोजी चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे आलापल्ली – चंद्रपूर महामार्गावर वनविभागाच्या तपासणी नाक्या समोर लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून बारा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 14 मे रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.
मृतक मुलगी सोनाक्षी मसराम वय 12 वर्ष रा. नांदगाव फाटा ता. राजुरा जि.चंद्रपूर असे मृतक मुलीचे नाव आहे.
मृतक मुलगी आपल्या मामासोबत दुचाकी क्रमांक MH 34 AZ 9575 ने आष्टीवरून गोंडपिपरी कडे जाताना वनविभागाच्या तपासणी नाक्यासमोर दुचाकी घसरली यात दुचाकीवरून मृतक मुलगी आणि तिचा मामा खाली पडले ,एवढ्यात मागून बल्लारशाकडे लोहखनिज घेईन जाणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली मृतक मुलगी चिरडल्या गेली, यात ती मुलगीच्या जागीच मृत्यु झाला.
 घटनेनंतर ट्रक चालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून परार झाली आहे,
     ही संपूर्ण जिल्ह्यात दुर्दैव्या व अत्यंत दुःखद घटना असून या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करून मृतक कुटुंबियांना न्याय मिळवून द्या,अशी मागणी सिरोंचा सामाजिक कार्यकर्ता –
 सागर मूलकला यांनी सिरोंचा तहसील कार्यालय मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन पटवून मागणी केली आहे,