अनेकांनी घेतला महाआरोग्य शिबिराचा लाभ
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,शिक्षक व पालकांचीही उपस्थिती
एटापल्ली,
एटापल्लीचे लोकप्रिय कार्यकुशल व युवा नेतृत्व राघवभाऊ सुल्वावार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १६-०६-२०२३ रोजी आदिवासी गोटूल भवन एटापल्ली येथे महाआरोग्य शिबीर व गुणवंत विध्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मध्ये एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील प्रत्येक शाळेतील प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यामुळे विध्यार्थी भारावून गेले.
डॉ.मुरलिस होप हॉस्पिटल नागपुर यांच्या संयुक्त विद्यमानातुन या महाआरोग्य शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित सागरजी अहिर जिल्हा प्रचारक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहेरी,हेमंतजी जंबेवार सहसंपर्क प्रमुख शिवसेना गडचिरोली,राकेशजी बेलसरे जिल्हाप्रमुख शिवसेना गडचिरोली,राजगोपालजी सुल्वावार जिल्हा संघटक शिवसेना गडचिरोली,पौर्णिमाताई इष्टाम जिल्हा महिला आघाडी संघटिका गडचिरोली,डॉ.सचिन कन्नाके तालुका आरोग्य अधिकारी एटापल्ली,सुशीलताई रच्चावार महिला आघाडी तालुका संघटिका एटापल्ली,महेश पुल्लुरवार अध्यक्ष व्यापारी संघटना एटापल्ली,किसन मठ्ठामी शिवसेना एटापल्ली,बिरजू तीम्मा नगरसेवक न.प.एटापल्ली हे मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता पुढाकार घेतलेले राहुल कुळमेथे नगरसेवक न.प.एटापल्ली,संपत पैडाकुलवार अध्यक्ष भाजपा यु.मो.एटापल्ली, मोहनजी नामेवार भाजपा एटापल्ली,राजेश हजारे अध्यक्ष क्रीडा विभाग संजीवनी फाऊंडेशन विदर्भ,अनिकेत मामीडवार अध्यक्ष राजमुद्रा फाऊंडेशन एटापल्ली,तनुज बल्लेवार अध्यक्ष टायगर ग्रुप एटापल्ली,मनीष ढाली उपाध्यक्ष राजमुद्रा फाऊंडेशन
एटापल्ली,रोहित बोमकंटीवार, प्रज्योत बल्लेवार,शितल कुंभारे,भाग्यलक्ष्मी करमरकर,महेंद्र सुलवावार,नयन रामटेके,उमेश मडावी,रवी पुंगाटी,रोहित मोहूर्ले,पियुष वरखडे,सुमित करमरकर,योगेश सडमेक हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.