प्रतिनिधी//
एटापल्ली तालुक्यातील क्रीडा संकुल चे लोकार्पण
एटापल्ली :- तालुक्यातील भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय चा पतंगनावर कृष्णार रोड वर क्रीडा संकुल चा उदघाटन मा. ना. धर्माराव बाबा आत्राम अन्न व औषधं प्रशासन मंत्री महाराष्ट्र शासन याचा हस्ते करण्यात आलं. यावेळी मंचावर ते बोलत असताना या क्रीडा संकुल चा माध्यमातून या परिसरातील विद्यार्थी व नागरिकांना क्रीडा दालन मुळे क्रीडा व कला चा दर्जा उंचावेल, यातालुक्यात आधी आधी 2 कोटी एवढा विकास निधीस याच त्याला वाढवून 10 कोटी केलं विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. सदर सोहळ्याला प्रमुख उपस्थिती मा. श्री विजय आकरे अप्पर जिल्हाधिकारी अहेरी, मा. श्री वैभव वाघमारे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली, मा. ययश्री प्रशांत दोंदल जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली, मा. श्री पी. व्ही. चौधरी तहसीलदार एटापल्ली व मा. भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली हे होते.
ह्या लोकार्पण सोहळ्यात मा. नामदार श्री धर्मराव बाबा आत्राम कॅबिनेट मंत्री ह्यांचा प्रथम नगरीत आगमन झाले ह्यामुळे मोठ्या जल्लोषात नागरीकांनी ढोलाच्या तालात त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या कडून समस्या व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.