रुग्णालयातून पळून जाऊन विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

38

स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या इसमाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राजेश्वर गिरीधर गडपायले वय ५० वर्षे, रा. धानोरा असे मृतकाचे नाव आहे.
मृतक हा धानोरा येथे लाँड्रीचा व्यवसाय करीत होता. मागील काही दिवसांपासून तो आजारी होता. त्याला धानोरा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. अशातच त्याने
धानोरा सालेभट्टी मार्गावरील एका शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तो सकाळी दवाखान्यात न दिसल्याने त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध सुरु केली असता विहिरीच्या तोंडावर त्याची चप्पल ठेवलेली दिसून आली. याची माहिती पोलीस स्टेशनला दिली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बांबू टाकून पाहणी केली असता त्याचे प्रेत पाण्यावर तरंगले. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी भेट दिली. आत्महत्येचे नेमके कारण गुलदस्त्यात आहे.