गडचिरोलीतील संविधान चौकात पानठेल्याला भीषण आग; साहित्य जळून खाक

184

प्रतिनिधी//

गडचिरोली: शहरातील वर्दळीच्या ठिकाण असलेल्या संविधान चौक परिसरात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी एका पानठेल्याला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत पानठेल्यातील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास संविधान चौकातील एका पानठेल्यातून अचानक धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण ठेल्याला विळखा घातला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती