अहेरी तालुक्यातील मौजा – कोरेपल्ली पासुन ते कवटाराम, कप्पेवंचा, नैनेर,आसा या गावांना जोडणारा रस्ता बांधकामाची पाहणी *माजी पंचायत समितीचे सदस्य – हर्षवर्धन बाबा आत्राम* यांनी केले.
सदर रस्त्याला *महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम साहेब* यांनी सन २०१९ च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर नागरीकांचा मागणी प्रमाणे नियोजनात घेवुन, रस्ता मंजुर केलेला आहे. त्यामुळे सदर रस्ताची बांधकामाला सुरू झाली होती. परंतु काही लोकांमुळे सदर रस्त्याची बांधकाम थांबलेला आहे.
म्हणुन मौजा – कोरेपल्ली, कवटाराम, कप्पेवंचा, नैनेर, आसा या गावातील नागरिकांनी *माजी पंचायत समितीचे सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम* यांना विनंती केले की, कोरेपल्ली ते आसा या आमचा रस्ता हे पायवाटी मार्ग होता, पावसाळ्यात तर या रस्ता पुर्णपने चिखलाने भरलेला असतो म्हणुन आम्हाला एका गावातुन दुसरा गावाला सुध्दा जावू शकत नाही, तसेच पावसाळ्यात तर एकदा व्यक्तीची ताब्यात जरी बिघडला तर त्या व्यक्तीला आम्ही सरकारी आरोग्य केंद्रापर्यंत नेवु सुध्दा शकत नाही, म्हणुन आमचा या समस्या दुर करण्यासाठी *माननिय राजे धर्मराव बाबा आत्राम साहेब* यांनी हा आमचा रस्ता मंजुर केलेले आहे.
*परंतु आता काही लोकांनी आपला सर्ता साठी सदर रस्ताची बांधकाम थांबवण्याचा काम केलेले आहेत.* म्हणुन आमचे गावांना जोडणारा रस्ताची बांधकाम थांबवण्याचा काम करणारे लोकांवर त्वरीत कार्यवाही करावे आणि तसेच आम्ही सुध्दा आमचे गावाचा विकास कामे थांबणाऱ्या विरोधात आमचा पोलीस स्टेशन मध्ये जावून तक्रार सुध्दा करणार आहो असे नागरिकांची *हर्षवर्धन बाबा आत्राम* यांना म्हणाले.
यावेळी *माजी पंचायत समितीचे सदस्य – हर्षवर्धन बाबा आत्राम* यांनी नागरीकांना शब्द दिले की, मी *आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम साहेब* यांना या बाबतची माहिती देतो व सदर रस्ताची बांधकाम थांबवणारे लोकांनवर कार्यवाही होईल आणि सबंधित अधिकाऱ्यांना ही सांगुन तुमचा या रस्त्याची बांधकाम पुन्हा सुरू करायला सांगतो असे *हर्षवर्धन बाबा आत्राम* म्हणाले.
यावेळी उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच – बालाजी गावडे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते – रामा गावडे, मंगेश कुळमेथे, रैनु गावडे, गावकरी – बोड्डा कुळमेथे, रामा गावडे, जोगी गावडे, बीच्यु गावडे , साईनाथ गावडे सह नागरीक उपस्थित होते.